
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतंच भारतात अॅपल स्टोअरचं उद्घाटन केलं आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी अॅपल प्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.

अॅपलचं भव्य दिव्य स्टोअर पाहिल्यानंतर कर्माचाऱ्यांना मासिक किती पगार असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यांचा पगार ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, अॅपल स्टोअरमध्ये काम करण्यासाठी जवळपास 170 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगाल 1 लाख रुपये आहे. कंपनी इंडस्ट्रीच्या तुलनेत चारपट अधिक पगार देत आहे.

अॅपल ग्राहकांना सुविधा देण्यासाठी जवळपास 20 भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम कर्मचारी आहेत.