
आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे.

जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते.

जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात.

जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे.