
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्या व्यक्तीला किती पगार मिळतो?. अन्य काय-काय सुविधा मिळतात?. एअरफोर्स विमान, लिमोजीन कार, सीक्रेट एजंट...अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला काय-काय मान सन्मान मिळतो.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या लिमोजीन कारमधून प्रवास करतात. त्याला 'द बीस्ट' नाव दिलय. अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने ही कार तयार केलीय. ही कार इतकी सुरक्षित आहे की, यावर अण्वस्त्र हल्ला तसच केमिकल हल्ल्याचा सुद्धा परिणाम होत नाही.


राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसमध्ये पहिल्यांदा प्रवेश करतात, तेव्हा त्यांना 1 लाख डॉलर म्हणजे जवळपास 84 लाख रुपये मिळतात. या पैशातून ते आपल्या घराला हवं तसं सजवू शकतात.

त्याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एंटरटेनमेंट आणि अन्य खर्चांसाठी 19 हजार डॉलर म्हणजे जवळपास 16 लाख रुपये मिळतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सिक्रेट सर्विस एजंटकडे असते. ते एअरफोर्स वन विमानाने प्रवास करतात.