
गाढव हा एक पाळीव प्राणी आहे. अनेक देशांमध्ये गाढवाला पाळलं जातं. त्याच्यापासून विविधं प्रकारची उत्पन्न मिळवली जातात.

तुम्हाला माहिती आहे का? गाढवाचं दूध हे जगातील सर्वात महाग दुधापैकी एक आहे. गाढवाच्या दुधाचा उपयोग हा विविध सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये होत असल्यानं त्याच्या दुधाला मोठी मागणी असते.

अनेक देशांमध्ये गाढवं पाळली जातात. त्याचा उपयोग हा ओझी वाहण्यासाठी आणि ज्या भागांमध्ये गाडी किंवा इतर साधन जात नाहीत अशा ठिकाणी होतो.

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गाढवं पाळली जातात,पाकिस्तानमध्ये जी गाढवं पाळली जातात, त्यांना चीनमध्ये मोठी मागणी आहे.

पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? की गाढव हा देखील एका देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आज आपण त्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत.

गाढव हा कॅटलोनिया देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, हा देश स्पेनच्या शेजारी आहे. काही वर्षांपूर्वी स्पेनमधून काही प्रदेश वेगळा झाला होता, त्यालाच आज कॅटलोनिया नावानं ओळखलं जातं.

गाढव हा कॅटलोनिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. या देशात गाढवांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असून, विविध जातींची गाढवं पाळली जातात.