दूरदर्शनवरील या मालिकेने कश्मीरची खरी कहाणी उलगडली, 39 वर्षांपूर्वीची मालिका पुन्हा ट्रेंडमध्ये, YouTube पाहण्यासाठी झुंबड

या मालिकेत हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले होते. कथेमध्ये जिवंतपणा आणि खोली आणण्यासाठी अनेक स्थानिक काश्मिरी लोकांनाही अभिनयाची संधी देण्यात आली होती. या मालिकेत कुणाल खेमू, परिक्षित साहनी, नीना गुप्ता, राधा सेठ, पंकज बेरी, एन.के. फुल्ल आणि कंवरजीत सिंह यांसारखे मोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

| Updated on: Apr 29, 2026 | 12:54 PM
1 / 5
कश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य अनेकांसाठी आकर्षण ठरते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर अनेकजण येथे कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी जातात. पण एक काळ असा होता की दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे अनेकजण कश्मिरला जाणे टाळत होते. 1987मध्ये अशीच एक मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेत कश्मीरमधील भयान सत्य दाखवले होते. आजही ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध आहे. ही मालिका अचानक चर्चेत आली आहे.

2 / 5
आम्ही ज्या मालिकेविषयी बोलत आहेत ती 'गुल गुलशन गुलफाम' आहे. ही मालिका दूरदर्शनवर प्रदर्शित झाली होती. ही मालिका आजही तिच्या संवेदनशील कथेसाठी आणि वास्तववादासाठी ओळखली जाते. या मालिकेत केवळ एक कथा नव्हती, तर काश्मीरचे खरे वास्तव मांडण्यात आले होते. मालिकेच्या नावाचा अर्थ 'गुल' (फूल), 'गुलशन' (बाग) आणि 'गुलफाम' (माळी) असा होतो.

3 / 5
मालिकेत दाखवण्यात आले होते की, एक काश्मिरी कुटुंब त्यांच्या तीन हाऊसबोटच्या साहाय्याने आपला उदरनिर्वाह कसे करते. परंतु, वाढत्या दहशतवादामुळे त्यांच्या कमाईवर गदा येते. दहशतवादामुळे पर्यकांसाठी हाऊसबोट चालवणे कठीण झाले होते. काश्मीर खोऱ्यात दहशतवादामुळे भीती आणि अस्थिरता कशी वाढत गेली, हे या मालिकेत अतिशय प्रभावीपणे मांडले होते. ही साधी वाटणारी कथा प्रत्यक्षात काश्मीरची भयाण हकीकत होती.

4 / 5
९० च्या दशकात जिथे मालिका केवळ मनोरंजनासाठी बनवल्या जात होत्या, तिथे या मालिकेने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काश्मीरचा मुद्दा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. खोऱ्यातील बेरोजगारी, विस्थापन (पलायन) आणि आर्थिक संकट यांसारख्या विषयांवर यात प्रकाश टाकण्यात आला होता.

5 / 5
मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान संपूर्ण टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. काश्मीरमधील वाढता तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव चित्रीकरण वारंवार थांबवावे लागले. सुरुवातीला या मालिकेचे शूटिंग काश्मीरमध्येच होत होते, मात्र कलाकार आणि टीमला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. त्यानंतर मालिकेचे उर्वरित शूटिंग मुंबईतील फिल्म सिटीमध्ये करावे लागले.

Follow Us