
शिक्षण हा समाजाचा आत्मा. मोर्चा काढण्यापेक्षाही जास्त मुलांना आणि मुलींना ज्ञानगंगा उपलब्ध करुन देणं महत्वाचं

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे.शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरू नाही या मतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ठाम होते.

एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते म्हणायचे. मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका, ही आपल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत

केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही. सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे