
प्रसिद्ध जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया (Vivek Dahiya) एकमेकांच्या प्रेमात आहेत. तर या जोडीकडे टीव्ही विश्वातील सर्वात प्रेमळ जोडपं म्हणून पाहिले जाते. लग्नानंतर दोघं मुंबईत एकत्र शिफ्ट झालेत. तर सोशल मीडियावर दिव्यांका अनेकदा आपल्या घराचे फोटो शेअर करत असते. आज या सुंदर जोडप्याचं घर कसं आहे ते पाहूयात.

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया काही दिवसांपूर्वी हा फोटो शेअर केला होता. या फोटोत घराचा हॉल दिसतो आहे. हे जोडपं अनेकदा पार्टी करतं. त्यांनी घराचा रंग तपकिरी ठेवला आहे. जो बघायला खूप सुंदर दिसतो.

दिव्यांकाच्या घरात एक मध्यम क्षेत्र देखील आहे. जिथे घरातील सर्व कामे केली जातात. या भागात बर्याच वेळा दिव्यंका त्रिपाठी आणि विवेक दहिया एकत्रित व्यायाम करताना व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

दिव्यांका त्रिपाठीनं घरात स्टडी स्पेस केली आहे. जिथे ती पुस्तकं वाचताना आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दिव्यांकानं आपल्या घरात एक छोटंसं मंदिर बांधलं आहे. जिथे ती देवाची पूजा करते. अभिनेत्रीचे हे फोटो गणेशोत्सवाचे आहेत जेव्हा तिने घरात गणेशाची मुर्ती बसवली होती.

दोघांच्या घरात डायनिंग एरिया देखील आहे. जिथे दिव्यांका तिच्या कुटूंबियांसोबत रात्रीचं जेवण करते.

या घराला एक सुंदर बाल्कनी आहे. या बाल्कनीत काचेची भिंत आहे. जिथून तुम्हाला संपूर्ण मुंबई आनंदाने पाहायला मिळते.

सुरुवातीपासूनच या जोडप्याला जेवणाची आवड आहे, यामुळे या देघांनी त्यांचं स्वयंपाकघर खूप सुंदर बनवले आहे.