
हिवाळ्यात आरोग्याच्या आणि त्वचेच्या असंख्य समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते. हेच नाही तर सतत हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासोबतच तुम्ही काय खाता हे देखील महत्वाचे ठरते. थंडी जास्त असल्याने घशात त्रास होणे आणि सर्दी आल्यासारखे वाटणे साहजिक आहे.

अशावेळी थोडा आराम मिळण्यासाठी पातळ आणि गरम गोष्टी खाण्याची इच्छा आपल्यापैकी अनेकांना होते. मात्र, दरवेळीच सूप बनवून पिणे देखील अजिबातच शक्य नाही.

अशावेळी तुम्हाला काहीतरी झटपट आणि सोपे हवे असते. अगोदरच सर्दीचा त्रास होत असल्याने फार काही बनवून खाण्याची इच्छा देखील अजिबातच होत नाही.

अशावेळी तुम्ही भातावरचे गरम पाणी सूपसारखे खाऊ शकतो. ज्यामुळे थोडा आराम नक्कीच मिळेल आणि हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते.