Drishyam 3: ‘सुखाने मरू तरी द्या..’ विजय साळगावकरने पुन्हा बाहेर काढला सॅमचा सांगाडा; मीम्स पाहून पोट धरून हसाल

Drishyam 3 वर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. विजय साळगावकर, समचा सांगाडा आणि सिनेमाच्या कथानकावर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. पहा कोणत्या आहेत त्या मीम्स.

| Updated on: Oct 09, 2026 | 12:57 PM
1 / 7
चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही प्रेक्षकांनी कथानकाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर करत चित्रपटाची मजा घेतली आहे.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही प्रेक्षकांनी कथानकाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर करत चित्रपटाची मजा घेतली आहे.

2 / 7

‘दृश्यम-3’मध्ये अजय देवगणने पुन्हा एकदा विजय साळगावकरची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता, प्रकाश राज आणि जयदीप अहलावत हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.

3 / 7

‘दृश्यम-3’ हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीतील हा तिसरा भाग असून, यामध्ये पुन्हा एकदा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाभोवतीचं रहस्य प्रेक्षकांसमोर आलं आहे. सॅमच्या खुनाचं गूढ उकलण्यासाठी पोलीस पुन्हा तपास सुरू करतात. मात्र, यावेळीही विजय आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. याच प्रश्नांभोवती चित्रपटाची कथा पुढे जाते.

4 / 7

या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. अभिषेक पाठक, आमिल कीयान खान आणि परवेझ शेख यांनी पटकथेवर काम केलं आहे.

5 / 7

2 ऑक्टोबर 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. ‘दृश्यम २’मध्ये घडलेल्या घटनांचा पुढचा परिणाम तिसऱ्या भागात पाहायला मिळतो.

6 / 7

चित्रपटाच्या कथानकापासून विजयच्या प्लॅनिंगपर्यंत अनेक गोष्टींवर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

7 / 7

‘दृश्यम-3’शी संबंधित हे मजेशीर मीम्स पाहून नेटकऱ्यांची चांगलीच करमणूक होत आहे. त्यामुळे चित्रपटासोबतच सोशल मीडियावरही विजय साळगावकरचीच चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us