
ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्यात मंगळ आणि शनी ग्रहाची युती होणार आहे. या युतीचा परिणाम एकूण तीन राशींवर पडणार आहे. मीन राशीमध्ये या दोन्ही ग्रहांची युती होईल. दरम्यान,या तीन राशींनी 11 मेपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

11 मे नंतर मंगळ ग्रह मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. येत्या 2 एप्रिल रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रहाच्या गोचरनंतर मेष राशीने विशेष काळजी घ्यावी. आयुष्यात चढउतार येऊ शकतात. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तुमचे पैसे कुठेतरी अडकून पडू शकतात.

मंगळ आणि शनी ग्रहाची युती ही कन्या राशीसाठी चांगली नसल्याचे मानले जाते. त्यामुले कन्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी. त्यांनी व्यवसायात पैशांची गुंतवणूक करताना विचार करावा. करिअरमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच पुढचा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो. आर्थिक नुकसानही होऊ शकतो.

मीन रासीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनी ग्रहाची युती चांगली नसल्याचे म्हटले जाते. या युतीचा मीन राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तसेच पैशांची चणचण निर्माण होऊ शकते. मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.