पुण्यात आढळला चक्क अतिदुर्मिळ काळतोंड्या साप, लाजाळू तितकाच… पापणी लवताच… Photo पाहाच!

साप पाहिल्यानंतर भीती वाटते, पण पुण्यात अतिदुर्मिळ काळतोंड्या साप आढळला आहे. जो लाजाळू पण तितकाच खतरनाक देखील आहे... पुण्यातील नसरापूर येथे एका नागरिकांनी घराच्या परिसरात साप दिसल्याची माहिती सर्प मित्रांना कळविल्यानंतर पुणे जिल्हा वन्य प्राणी सर्प रक्षक असोसिएशनचे सदस्यांनी तात्काळ धाव घेत तत्परतेने त्याचे सुरक्षित रेस्क्यू केले

| Updated on: Mar 18, 2026 | 11:21 AM
1 / 5
सापाचं सुरक्षित रेस्क्यू केल्यानंतर, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून सर्पाला कोणतीही इजा न करता सुरक्षितरीत्या पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.. काळतोंड्या सर्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप अत्यंत दुर्मिळ असून त्याचे डोके पूर्णपणे काळ्या रंगाचे असते.

2 / 5
त्यामुळेच त्याला ‘काळतोंड्या’ असे नाव पडले आहे.. इंग्लिशमध्ये याला Dumeril's Black-headed Snake असे नाव आहे..या सर्पाचे शरीर साधारणपणे फिकट तपकिरी, करडे किंवा हलक्या रंगाचे असते आणि शरीर बारीक व सडपातळ असते.

3 / 5
बिनविषारी आणि अतिशय लाजाळू स्वभावाचा साप असून साधारणपणे या सर्पाची लांबी 20 ते 40 सेंटीमीटर इतकी असते.. हा सर्प प्रामुख्याने जंगलातील ओलसर भागात, दगडाखाली, पानांच्या ढिगाऱ्यात किंवा झाडांच्या मुळांजवळ आढळतो.

4 / 5
कधी कधी तो शेतजमिनीच्या आसपास किंवा ग्रामीण भागातही दिसून येतो.धोका जाणवला की तो पटकन लपून बसतो. त्यामुळे माणसांसाठी हा सर्प सामान्यतः धोकादायक नसतो.

5 / 5
‘काळतोंड्या’ सापाचा आहार मुख्यतः कीटक, गांडुळे, लहान सरडे तसेच इतर लहान प्राणी असा असतो. त्यामुळे पर्यावरणातील कीटक नियंत्रणासाठीही या सर्पाचे महत्त्व आहे. सध्या ‘काळतोंड्या’ सापाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Follow Us