Photo : ‘गुरुची लेक जीवनसाथी’, DYSP पैलवान राहुल आवारेची काका पवारांच्या लेकीशी लगीनगाठ

| Updated on: Jan 04, 2021 | 4:59 PM

1 / 5
अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची कन्या ऐश्वर्या आणि बाळासाहेब आवारे यांचे चिरंजीव डीवायएसपी पैलवान राहुल आवारे यांचा विवाह सोहळा रविवारी पुण्यामध्ये संपन्न झाला.

2 / 5
राहुल आणि प्रियांका यांच्या विवाहसोहळ्याला दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच सामाजिक आर्थिक क्षेत्रातल्या मान्यवरांनीही वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले.

3 / 5
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी राहुलचा ऐश्वर्या पवारसोबत साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला होता. 3 जानेवारीला लग्नाची तारीख होती. त्यानुसार रविवारी पुण्यात थोरा-मोठ्यांच्या साक्षीने राहुल प्रियांकाने सप्तपदी घेत एकमेकांच्या साथीने आयुष्य घालवण्याच्या आणाभाका घेतल्या.

4 / 5
पाटोद्याचा कुस्तीपटू राहुल आवारेने ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या फ्री-स्टाईल कुस्तीत कॅनडाच्या खेळाडूला चीतपट करत सुवर्णपदकाची कमाई केली होती. महाराष्ट्राचा झेंडा जगात फडकवणाऱ्या खेळांडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुसार राहुल आवारेला गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक पदावर नियुक्ती केलीय.

5 / 5
प्रियांकाशी लग्न करुन राहुल आवारे त्याचे गुरु भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु काकासाहेब पवार यांचा जावई झाला.