
हिवाळ्याच्या दिवसात ब्रोकोलीचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. ब्रोकोलीमध्ये फायबर, पोटॅशिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक असतात. सूप, सॅलॅड किंवा भाजीच्या स्वरूपात ब्रोकोली खाता येते. त्याच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून संरक्षण होते.

ब्रोकोलीमध्ये फायबर असते. ती खाल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते व भूक लागत नाही. ब्रोकोलीमुळे झपाट्याने वजन कमी करण्यास मदत होते.

ब्रोकोली ही आपले लिव्हर म्हणजेच यकृतासाठीही खूप फायदेशीर असते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. ब्रोकोली खाल्याने लिव्हरसंबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

ब्रोकोलीमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते , ज्यामुळे आपली हाडं मजबूत होतात. याच्या सेवनाने सांधेदुखी सारख्या हाडांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते - ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ऋतूमानानुसार येणाऱ्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. ब्रोकोलीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.