
हिवाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे ठरते. तुम्ही थोडे जरी दुर्लक्ष केले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात गरम गोष्टी खाण्यावर भर द्या.

थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक आपल्या आहारात बदल करतात आणि ते आवश्यक देखील आहे. हिवाळ्यात सर्वात महत्वाची खाण्यासाठी बाजरीची खिचडी ठरते.

बाजरीपासून बनवलेली खिचडी तिच्या पौष्टिक मूल्य, चव आणि पचनासाठीच्या फायद्यांमुळे सर्व वयोगटांतील लोकांसाठी आरोग्यदायी मानली जाते.

शिवाय जे लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही खिचडी फायदेशीर ठरते. दररोजच्या आहारात आपण समावेश करू शकता.
