Eggs Price: थंडीत अंड्याचे भाव कडाडले, अंड्याचा भाव शंभरीवर, किंमती ऐकून खवय्यांना हुडहुडी

Eggs Rate: कडाक्याच्या थंडीत अंड्याचे भाव सुद्धा कडाडले आहेत. एक डझन अंड्याचा भाव शंभरीवर गेला आहे. त्यामुळे खवय्यांना हुडहुडी भरली आहे. थंडीत अंड्यांची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्याने अंड्याचे दर भडकल्याचा दावा व्यापारी करत आहेत.

| Updated on: Dec 23, 2025 | 1:04 PM
1 / 6
Eggs Price Hike: कडाक्याच्या थंडीत अंड्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. एक डझन अंड्यासाठी 100 रुपयांची नोट कामी येत आहे. त्यामुळे खवय्यांच्या तोंडची चव गेली आहे. यापूर्वी त्यापेक्षा स्वस्तात अंडी येत होती. पण थंडी वाढताच मागणी वाढल्याने अंड्याच्या किंमतींचा भडका उडाला आहे. त्यामुळे थंडीत ऑम्लेट आणि अंडा करीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

2 / 6
मुंबई महानगर क्षेत्रात अंड्यांच्या किंमती 98-100 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. थंडीत अंड्याची मागणी वाढली आहे. तर देशभरातून होणारा पुरवठा खुंटला आहे. पुरवठा सुरळीत होईपर्यंत अंड्यांचे भाव भडकलेलेच असतील. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे खवय्यांना अंड्यासाठी खिसा खाली करावा लागत आहे. पूर्वीपेक्षा किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एक अंडं 6 -8 रुपयांदरम्यान मिळत होते. तो भाव आता 10 रुपयांपेक्षा अधिक आहे.

3 / 6
हिवाळ्यात अंड्यांना जास्त मागणी असते. पण त्या तुलनेत पुरवठा मात्र होताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यात अंड्यांची मागणी वाढते. या काळात अंड्यांचा वापर वाढतो. त्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. अंड्याच्या किंमती सध्यापेक्षा अधिक वाढण्याची भीती पण व्यक्त होत आहे. पुरवठा लवकर सुरळीत नाही झाला तर किंमती भडकू शकतात.

4 / 6
सर्वच राज्यात अंड्यांची मागणी वाढल्याने अंड्याच्या पुरवठ्यात 15-20 टक्क्यांची घट झाली आहे. जर अंड्यांची मागणी वाढतच राहिली तर मुंबईत अंड्यांच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंडा व्यापाऱ्यांच्या मते एक डझन अंड्याचा भाव 108 रुपयांवर जाऊ शकतो. अथवा तो 110 रुपयांपर्यंतही पोहचू शकतो. त्यामुळे खवय्यांची मोठी अडचण झाली आहे.

5 / 6
सध्या मुंबई महानगर क्षेत्रात रोज 1.10 कोटी अंड्यांची मागणी आहे. तर 85 लाख अंडीच मुंबईत दाखल होत आहे. येत्या काही दिवसात शेजारील राज्यातही अंड्यांची मागणी वाढली आणि त्याप्रमाणात उत्पादन झाले नाही तर मग मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून अंड्यांच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळ्यात अनेकांचा मूड ऑफ होऊ शकतो. तर मॉलमध्ये सुद्धा अंडे उपलब्ध असण्यावर परिणाम होऊ शकतो.

6 / 6
तर दुसरीकडे ग्रामीण भागात गावरान अंड्यांना अधिक मागणी आली आहे. तपकिरी रंगाच्या अंड्याची मागणी वाढली आहे. थंडीत अंडी शरिरासाठी पोषक असल्याने अंड्यांना मोठी मागणी आली आहे. त्यामुळे अंड्यांच्या दरात प्रतिनग दोन ते तीन रुपयांची वाढ झाल्याचे समोर येत आहे. गावरान अंडे दुर्मिळ झाल्याने या अंड्यांचे भाव गगनाला भिडले आहे. गावरान अंडे थेट 5 रुपयांनी महागल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खवय्ये हवालदिल झाले आहेत.