
दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न केले. खाजगी समारंभात या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. यानंतर दिया आणि वैभव यांना अव्यान नावाच्या गोंडस मुलाला 14 मे 2021 रोजी झाला.

दियाने या पोस्ट मध्ये म्हटले आहे की अव्यानच्या जन्माच्या वेळी तो प्री-मॅच्युअर होता. आता मुलगा अव्यानच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दिया मिर्झाला ते दिवस आठवले आहेत.याबाद्दल दियाने खास भावनिक पोस्ट लिहिली आहे.

दिया म्हणते . आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की जेव्हा त्यांचा मुलगा जन्मला तेव्हा 'इमॅजिन' गाणे वाजत होते असे म्हटले आहे. यासोबतच दियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे.

दियाच्या या पोस्टवर बॉलिवूड स्टार्सही कमेंट करत आहेत. अभिनेत्री ईशा गुप्ता आणि सागरिका घाटगे, सोफी चौधरी, गुल पनाग, बिपाशा बसू, गौहर खान यांनीही हार्ट इमोजी शेअर करून अव्यान प्रेम दिले आणि दियाला एकस्ट्रॉंग मदर म्हटले आहे.