Workout Tips : उपाशीपोटी व्यायाम करणं योग्य की अयोग्य? कोणी करावं, कोणीा टाळावं? एक्स्पर्ट सांगतात..

वर्कआऊट करणाऱ्यांमध्ये अनेक मिथकं लोकप्रिय आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की रिकाम्या पोटी व्यायाम करावा की नाही ? त्याने काही नुकसान होतं का ? चला डॉक्टर काय सांगतात ते जाणून घेऊया.

| Updated on: Sep 26, 2026 | 8:38 PM
1 / 6
सकाळी उठून रिकाम्या पोटी व्यायाम करणं , हा अनेक लोकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. काहींना हे फिटनेस रूटीनचा सोपा भाग वाटतो, पण काही जणांना याबद्दल प्रश्न पडतो. रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरात काय बदल होतात ? आणि त्याचा प्रत्येक व्यक्तीवर सेम परिणाम का होता नाही ? एक्स्पर्टकडून जाणून घेऊया महत्वाच्या गोष्टी

सकाळी उठून रिकाम्या पोटी व्यायाम करणं , हा अनेक लोकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. काहींना हे फिटनेस रूटीनचा सोपा भाग वाटतो, पण काही जणांना याबद्दल प्रश्न पडतो. रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरात काय बदल होतात ? आणि त्याचा प्रत्येक व्यक्तीवर सेम परिणाम का होता नाही ? एक्स्पर्टकडून जाणून घेऊया महत्वाच्या गोष्टी

2 / 6

डॉ. अरविंद अग्रवाल (डायरेक्टर, इंटरनल मेडिसिन, श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट) यांच्या म्हणण्यानुसार, रिकाम्या पोटी वर्कआउट करणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक किंवा फायदेशीर ठरेलच असं नाही. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोणत्या व्यक्तींनी रिकाम्या पोटी वर्कआउट करावे आणि कोणांनी करू नये, हे जाणून घेऊया.

3 / 6

रिकाम्या पोटी कोण करू शकतं व्यायाम ? - जर सकाळी हलका व्यायाम, उदा - चालण, योगासन किंवा कमी ते मध्यम तीव्रतेचे कार्डिओ करायचं असेल आणि त्या व्यक्तीला रिकाम्या पोटी व्यायाम करताना अस्वस्थ वाटत नसेल, तर तो व्यायाम केला जाऊ शकतो. मात्र, वजन कमी करण्यासाठी किंवा चांगले परिणाम मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक उपाशी राहून व्यायाम करणं हे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.

4 / 6

जड व्यायाम करणाऱ्यांनी काय करावे? - तज्ज्ञांच्या मते, जड वेट ट्रेनिंग, हाय-इंटेन्सिटी वर्कआउट किंवा दीर्घकाळ व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी व्यायाम करण्यापूर्वी थोडा हलका आणि सहज पचणारा आहार घेणं हे योग्य ठरतं. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा किंवा चक्कर येण्यासारख्या समस्या टाळता येऊ शकतात.

5 / 6

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे - रिकाम्या पोटी व्यायाम करताना त्यावेळी फॅट बर्निंग वाढू शकतं, पण यामुळे दीर्घकाळात वजन कमी होण्याचा फायदा निश्चित होतो, असे काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे वर्कआउटची वेळ ही त्या व्यक्तीची दिनचर्या, त्याचं उद्दिष्ट काय आणि त्याच्या शरीराची क्षमता कशी आहे, यानुसार ठरवली पाहिजे.

6 / 6

या चुका करू नका - जर रिकाम्या पोटी व्यायाम करताना चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं किंवा घाबरल्यासारखं होतं असेल किंवा थकवा येत असेल तर अशावेळी लगेच थांबा. मधुमेह, लो ब्लड प्रेशर किंवा इतर आजार असतील, त्या लोकांनी रिकाम्या पोटी वर्कआऊट किंवा व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us