आता झटक्यात निघणार PF चे पैसे, EPFO ने उचललं सर्वात मोठं पाऊल, डिसेंबर महिन्यापासून…

मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत यूपीआयच्या मदतीने पीएफ काढण्याची सुविधा सुरू केली जाऊ शकते. सुरुवातीच्या काळात यूपीआयच्या मदतीने पैसे काढण्याची मर्यादा ही 1000 रुपये ठेवली जाऊ शकते. छोटी रक्कम क्लेम करणाऱ्यांचा त्रास कमी व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 5:21 PM
1 / 5
कर्मचाऱ्यांना आपले पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ईपीएफओ (EPFO) वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करते. आता EPFO मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा देशातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.

2 / 5

मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत यूपीआयच्या मदतीने पीएफ काढण्याची सुविधा सुरू केली जाऊ शकते. सुरुवातीच्या काळात यूपीआयच्या मदतीने पैसे काढण्याची मर्यादा ही 1000 रुपये ठेवली जाऊ शकते. छोटी रक्कम क्लेम करणाऱ्यांचा त्रास कमी व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

3 / 5

बिझनेस स्टँडर्डने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही प्रणाली सुरू करण्यासाठी चाचणी केली जातेय. त्यासाठीच्या दोन चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचणीदरम्यान काही अडचणी आल्या होत्या. त्या दूर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

4 / 5

पीएफचे पैसे यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याच्या योजनेवर अधिकृतरित्या 28 मार्च 2025 रोजी चर्चा झाली होती. 29 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली होती.

5 / 5

कर्मचाऱ्यांना आपले पीएफचे पैसे यूपीआयच्या माध्यमातून काढता यावेत यासाठी प्रणाली तयार करण्याची जबाबदारी टेक्नोलॉजी पार्टनर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्यूटिंग (C-DAC) कडे सोपवण्यात आलेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us