Chanakya Niti : या तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्याही काळात अनेकांना मार्गदर्शक ठरतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात, ज्या कधीच कोणाला सांगता कामा नये, अगदी आपल्या पत्नीला देखील सांगू नका, कारण या गोष्टी जर लोकांना कळाल्या तर भविष्यात तुम्ही फार मोठ्या संकटात सापडू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
संपत्ती – चाणक्य म्हणतात तुमची संपत्ती किती आहे? तुमच्याकडे पैसे किती आहेत? या गोष्टी आयुष्यातही कधीही कोणाला सांगू नका, कारण जेव्हा तुमची खरी परिस्थिती लोकांना कळते तेव्हा तुम्हाला शत्रू निर्माण होऊ शकतात. म्हणजेच काय जर तुमच्याकडे खूप जास्त संपत्ती असेल तर लोक तुमचा मत्सर करतील, तुम्हाला अनेक शत्रू देखील निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुमच्याकडे संपत्ती नसेल तर लोक तुम्हाला कधीही मान सन्मान देणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे, याचा अंदाज कोणालाही येऊ देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
गुपीत – चाणक्य म्हणतात जर आयुष्यात तुमचं असं काही गुपीत असेल जे सर्वांसमोर आलं तर तुम्ही संकटात सापडू शकता, तर असं गुपीत आयुष्यात कधीही कोणाला सांगू नका, अगदी आपल्या पत्नीला देखील सांगू नका, लक्षात ठेवा भितींना देखील कान असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
घरातील भांडणं – चाणक्य म्हणतात जर तुमच्या घरात कोणत्याही कारणांमुळे काही वाद सुरू असतील किंवा भांडणं सुरू असतील तर असे वाद कधीही कोणाला संगू नका, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
