AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये मुंबईचा पोरगा मैदानात, कॅप्टन तिलकचा मोठा निर्णय, नेमका कोण?

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या सेमीफायनलमध्ये भारत ए आणि श्रीलंका ए आमनेसामने आहेत. कर्णधार तिलक वर्माने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करण्यात आला असून मुंबईच्या खेळाडूला संधी मिळाली आहे. कोण आहे हा खेळाडू?

श्रीलंकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये मुंबईचा पोरगा मैदानात, कॅप्टन तिलकचा मोठा निर्णय, नेमका कोण?
Tanush Kotian debutImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 4:51 PM
Share

टीम इंडिया ए आणि श्रीलंका ए यांच्यामध्ये आज आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चा सेमीफायनल दोहामध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात कॅप्टन तिलक वर्माने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. लंका आणि भारत दोन्ही टीम पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. भारताने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी दोनमध्ये विजय मिळवेला तर श्रीलंकेने तीन सामने खेळले आणि सर्व तिन्ही सामने जिंकले आहेत. पण असं असलं तरी टीम इंडियाने मात्र जे दोन सामने जिंकले ते दोन्ही एकतर्फी विजयाने जिंकले. मागिल सामन्यात भारताने यूएईविरुद्ध फक्त 14 ओव्हरमध्येच 250 धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने फक्त 52 बॉलमध्ये सर्वात तोडफोड फलंदाजी करत 204 धावांची शानदार आणि रेकॉर्डब्रेक खेळी केली होती.

टीममध्ये एक मोठा बदल

दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. टीमचा कॅप्टन तिलक वर्मा याने यावेळी संघाच्या प्लेइंग 11 मुंबईचा खेळाडून तनुष कोटीयनला संधी दिली आहे. प्रभासिमरण सिंह यांच्या जागी तनुषला संधी देण्यात आली आहे. आज तनुश कोटीयन याचा डेब्यू ठरला आहे.

तनुश मुंबईचा खेळाडू

तनुश हा मुंबईमधील खेळाडू आहे. 28 वर्षांचा तो एक ऑलराऊंडर आहे. त्याने मुंबईला अनेक सामने जिंकून दिलेत. हेही एक मोठं कारण त्याच्या प्लेइंग 11 मधील निवडीमागे असू शकतं. त्याने आतापर्यंत 51 सामन्यांमध्ये 2437 रन केले आहेत. तर बॉलिंग फिगर 8/81 राहिला आहे. याशिवाय त्याने लिस्ट ए सामन्यांमध्ये 198 धावा ठोकल्या आहेत. त्याने एकूण 27 सामने खेळले आहेत. 4/31 ही त्याची बॉलिंग फिगर आहे. टी20 मध्ये त्याने 36 सामन्यांत 89 रन केले आहेत. 4/16 त्याची बॉलिंग फिगर आहे. आयपीएलमध्ये त्याने केवळ एकच सामना खेळला आहे. त्याने 24 धावा केल्यात. आता तो या सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, वैभवने या सामन्यामध्ये 27 बॉलमध्ये केवळ 40 धावा करुन तो आऊट झाला आहे.

भारत ए (प्लेइंग इलेव्हन)

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कॅप्टन), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), रिंकू सिंह, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, तनुष कोटियन, हर्ष दुबे, हर्षित राणा, अरशद खान

श्रीलंका ए (प्लेइंग इलेव्हन)

लसिथ क्रूसपुले, सिनेथ जयवर्धने, निशान मदुष्का (विकेटकीपर), पवन रथनायके (कॅप्टन), निपुण धनंजय, जेनिथ लियानगे, वानुजा साहन, विजयकांत वियास्कंथ, रविन्दु फर्नांडो, लाहिरू समराकून, गरुका संकेथ

Follow Us
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प