AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत सिंह यांच्या कन्येच्या लग्नाला गालबोट, घोडेस्वारी पाहायला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू, गर्दीतच…

आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगीच्या विवाह सोहळ्याला गालबोट लागले. मोकामा येथील त्यांच्या लग्न समारंभात आयोजित घोडेस्वारी पाहण्यासाठी आलेल्या प्रचंड गर्दीत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. यामुळे भव्यदिव्य समारंभात अचानक खळबळ उडाली.

अनंत सिंह यांच्या कन्येच्या लग्नाला गालबोट, घोडेस्वारी पाहायला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू, गर्दीतच...
Horse racingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 5:01 PM
Share

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी हिचा विवाह अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात पार पडला. रात्रभर हा विवाह सोहळा सुरू होता. आज सकाळी लोक आपल्या घराकडे जायला निघाले. या लग्नाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी घोडेस्वारीही ठेवण्यात आली होती. दुपारी घोड्याच्या रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून लोक आले होते. लाखो लोकांची गर्दी उसळली होती. यावेळी एका बुजुर्ग व्यक्तीचा मृत्यू झाला. हा 65 वर्षीय व्यक्ती गर्दीतच मरून पडलेला आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

हा बुजुर्ग व्यक्ती गर्दीत बेशुद्धावस्थेत आढळला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. संध्याकाळी 6 वाजता तो बेशुद्ध पडल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी मोटरसायकलवरून त्याला अनुमंडळ रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला मृत घोषित केलं. या घटनेचा संबंधित व्हिडिओ समोर आला आहे. या बुजुर्ग व्यक्तीला व्हिलचेअरवर ठेवून त्याची तपासणी केली जात आहे. बाजूला काही पोलीसही उभे असल्याचं दिसून येत आहे.

स्पर्धा रद्द

शिवांगीचं लग्न काल 25 नोव्हेंबर रोजी पार पडलं. यावेळी घोडेस्वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत देशभरातून घोडेस्वार सहभागी झाले होते. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. अनंत सिंह स्वत: ही स्पर्धा पाहण्यासाठी पोहोचले होते. पण प्रचंड गर्दी झाल्याने घोडेस्वारीची स्पर्धा रद्द करण्यात आली. आज फायनल स्पर्धा होणार आहे.

कुणी टॉवरवर तर कुणी झाडावर

लदमा गावात ही स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून लोक आले होते. कुणी मोबाईल टॉवरवर चढून स्पर्धा पाहत होते तर कुणी झाडावर चढून स्पर्धा पाहत होते. प्रचंड गर्दीत मिळेल त्या ठिकाणी जाऊन लोक उभे होते. जीवाची पर्वा न करता मोबाइल टॉवर आणि झाडावर लोक चढल्याने अनंत सिंह यांनी माइकवरून त्यांना उतरण्याचं आवाहन केलं. पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही. त्याचवेळी गर्दीत एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळल्याने सर्वच चकीत झाले. काही मीडिया रिपोर्टनुसार, या बुजुर्ग व्यक्तीच्या खिशात 2,120 रुपये मिळाले आहेत. इतर कागदपत्र वा मोबाईल फोन या व्यक्तीकडे आढळून आला नाही. आता हा व्यक्ती कोण? तो कुठून आला? त्याच्यासोबत कोण होते का? याचा शोध घेऊन या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Follow Us
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प