AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fawad Khan : हा पाकिस्तानचा विजय! भारतात पाकिस्तानी सीरिजवरून वाद, फवाद खानचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या नव्या सीरिजवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ही सीरिज भारतात बॅन करण्याची मागणी केली जात आहे. यावर आता अभिनेत्यानंसडेतोड उत्तर दिलं आहे.

Fawad Khan : हा पाकिस्तानचा विजय! भारतात पाकिस्तानी सीरिजवरून वाद, फवाद खानचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
| Updated on: Nov 26, 2026 | 4:56 PM
Share

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘खूबसूरत’, ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमधून भारतीय प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा फवाद सध्या त्याच्या आगामी नेटफ्लिक्स सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘जो बचे हैं संग समेट लो’ या पाकिस्तानी सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या सीरिजच्या भारतातील प्रदर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. अशातच फवाद खाननं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला फवाद खान?

नेटफ्लिक्सच्या पहिल्या पाकिस्तानी ओरिजिनल सीरिजचा ट्रेलर कराचीमध्ये एका खास कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी सीरिजमधील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री माहिरा खान या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही; मात्र तिनं टीमसाठी खास व्हिडिओ मेसेज पाठवला होता. या कार्यक्रमात फवाद खाननं सीरिजचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अभिनेता म्हणाला, ‘हा पाकिस्ताचा विजय आहे. या शोचा भाग होता आल्याचा मला अभिमान वाटतो. हा प्रवास सोपा नव्हता. ही एक भावनिक कथा आहे. माझे चाहते नेहमीच पाकिस्तानी ड्रामा पाहत आले आहेत. पाकिस्तानी टीव्ही आणि चित्रपटांमुळेच मला ओळख मिळाली. आता आमच्यासाठी पुढे जाण्याची ही एक मोठी संधी आहे.’

पाकिस्तानी कलाकारांच्या कथा जगभरातील प्रेक्षकांना आवडतात. नेटफ्लिक्समुळे या कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. ‘आमच्या कथा जगभरात पसंत केल्या जातात. नेटफ्लिक्सनं आमचं कंटेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवलं आहे. हा आमच्या सर्वांचा विजय आहे. अनेक वर्षांपासून लोक पाकिस्तानी ड्रामा पाहत आहेत. आता 191 देशांमधील प्रेक्षकांना आमच्या कथा पाहता येतील. भावनांना कोणतीही भाषा नसते’ असंही फवाद म्हणाला.

एकीकडे पाकिस्तानी कलाकार या सीरिजच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत असताना दुसरीकडे भारतात सीरिजच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं (AICWA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही सीरिज भारतात प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी चित्रपट, वेबसीरिज, गाणी आणि कलाकारांना भारतीय प्लॅटफॉर्मवर स्थान देऊ नये, अशी भूमिका संघटनेनं मांडली आहे. याशिवाय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही या सीरिजच्या भारतातील प्रदर्शनाला विरोध केला आहे. पाकिस्तानी कंटेंटच्या प्रसारणाबाबत 8 मे 2025 रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केलेल्या सल्ल्याचाही संघटनांनी संदर्भ दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला भारतात पाकिस्तानी कंटेंट प्रसारित न करण्याबाबत आधीच्या सूचनेचं पालन करण्यास सांगितलं आहे.

Follow Us
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प