भावा..याला म्हणतात गाणं, 10 वर्षानंतरही सुपरहिट, ऐकताच माणूस थेट नाचायला लागतो

4 कोटी बजेट अन् कमाई 110 कोटी. मराठी इंडस्ट्रीमधील या चित्रपटाने प्रेक्षकांना मनावर केलेलं राज्य. चित्रपटातील प्रत्येक गाणं ठरलेलं सुपरहिट. आजही त्या गाण्याची क्रेझ कायम.

| Updated on: Apr 30, 2026 | 1:40 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीतील 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर केलं इतकं राज्य की लग्न, हळदी आणि कोणत्याही कार्यक्रमात या गाण्यावर लोक धरायचे ठेका. आजही गाणं वाजलं की अंग हलत. आजही त्या गाण्याची क्रेझ कायम.

2 / 5
आजही हे गाणं वाजताच प्रत्येक व्यक्ती हरवून जातो. या गाण्याचं संगीत हे अजय-अतुल यांनी दिलं असून ते 10 वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलं होतं. चित्रपटाने केली होती प्रचंड कमाई. ते गाणं म्हणजे 'सैराट' चित्रपटातील झिंगाट गाणं.

3 / 5
मराठी चित्रपटसृष्टीत 2016 साली आलेल्या सैराट या चित्रपटाने अक्षरशः इतिहास घडवला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाला मराठी सिनेमांचा टर्निंग पॉइंट मानलं जातं. प्रदर्शनानंतर जवळपास दशक उलटलं असलं तरी ‘सैराट’ची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच जिवंत आहे.

4 / 5
या चित्रपटाची कथा तर सुपरहिट ठरलीच पण त्यामधील सर्वच गाणी देखील प्रचंड हिट झाली. यामध्ये ‘झिंगाट’, ‘याड लागलं’, ‘सैराट झालं जी’ ही गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. प्रत्येक गाणं कथेला पुढे नेणारं आणि भावनांना स्पर्श करणारं असल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव अधिक वाढला.

5 / 5
या चित्रपटातून रिंकू राजगुरू (आर्ची) आणि आकाश ठोसर (परश्या) यांनी पदार्पण केलं. पूर्णपणे नव्या चेहऱ्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे कथा अधिक वास्तवदर्शी वाटली. प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. सैराटला 10 वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

Follow Us