Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची मुलगी किती शिकली? जावयाचं शिक्षण काय? Exclusive माहिती पहिल्यांदाच समोर

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचे, ज्ञानेश्वरीचे एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण झाले आहे, तर जावई साहिलने अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. त्यांच्या लग्नानिमित्त ही खास माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. शिक्षण पूर्ण करून दोघांनीही मोठ्यांच्या संमतीने लग्न केले. इंदोरीकर महाराजांनी 'आम्ही तुमची संपत्ती नाही, माणसं पाहिली' असे म्हणत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

| Updated on: May 03, 2026 | 2:28 PM
1 / 4
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ इंदोरीकर ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचं ज्ञानेश्वरीचं लग्न आज संध्याकाळी 6.30 वाजता मोठ्या थाट्यात पार पडणार आहे. अहिल्यानगरात होणाऱ्या या लग्नाला आतापासूनच वऱ्हाडींची मोठी गर्दी झाली आहे. वऱ्हाडींच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी लग्नात चमचमीत जेवणाचा बेत ठेवण्यात आला आहे. तसेच कुणाचीही गैरसोय होणार नाही याची स्वत: इंदोरीकर महाराज खबरदारी घेत आहे. आज चिलप कुटुंब आणि इंदोरीकर कुटुंब नात्याच्या अतूट बंधनात अडकणार आहेत. मात्र, इंदोरीकर यांची मुलगी ज्ञानेश्वरी किती शिकली? जावयाचं शिक्षण किती? हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे याची अजूनही सर्वांना उत्सुकता लागली आहे. आम्ही तुम्हाला ही माहिती देणार आहोत.

2 / 4
ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या लग्नाची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. पण या लग्नपत्रिकेत दोघांच्याही शिक्षणाची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे इंदोरीकरांची मुलगी किती शिकली आणि जावयाचं शिक्षण किती हाच सर्वांना प्रश्न पडला आहे. जावई उद्योगपती घरातून आहे, हे माहीत आहे. पण उद्योगपतीच्या मुलाचं शिक्षण किती हा प्रश्न अद्यापही लोकांना पडला आहे. इव्हन वऱ्हाडी मंडळींचीही उत्सुकता ताणली गेली आहे.

3 / 4
किती शिक्षण? -  साहिल यांनी इंजीनिअरिंगचं शिक्षण गेल्यावर्षीच पूर्ण केलं आहे. तर ज्ञानेश्वरीनेही एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्यावर्षी दोघेही शिक्षण घेत असतानाच कुटुंबाने लग्नाचा निर्णय घेतला. साहिल आणि ज्ञानेश्वरी दोघेही आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नसल्याने त्यांनीही या लग्नाला संमती दर्शवली. दोघांनीही साखरपुड्यासाठी होकार दिला आहे. जेव्हा लग्न ठरवण्याची बैठक बसली तेव्हा इंदोरीकर महाराजांनी मार्मिक विधान केलं होतं. आम्ही तुमची संपत्ती पाहिली नाही, आम्ही माणसं पाहिली, असं इंदोरीकर महाराज लग्न जुळवताना म्हणाले होते.

4 / 4
हळद जोरात -  अहिल्यानगरमधील इंदोरी गावात काल ज्ञानेश्वरीची हळद जल्लोषात पार पडली. यावेळी असंख्य पाहुणे आले होते. सर्वजण अत्यंत उत्साहात होते. करवल्यांनी तर हळदीत ठेका धरला होता. स्वत: इंदोरीकर महाराज पाहुण्यांना जेवण वाढत होते. कुणाला काही कमी तर पडत नाही ना याची स्वत: जातीने दखल घेत होते. प्रत्येकाशी आत्मियतेने संवाद साधत होते. काय हवं काय नको याची माहिती घेत होते.

Follow Us