
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्नाच्या चार वर्षांनी घटस्फोट घेतला.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. हेच नाहीतर घटस्फोटाचे जाहीर करण्याच्या अगोदर नताशा हिने भारत सोडला.

नताशा ही सध्या तिच्या आणि हार्दिकच्या मुलासोबत सर्बिया येथे आहे. हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या मुलासोबत धमाल करताना नताशा ही दिसत आहे.

घटस्फोटाचे दु:ख विसरण्यासाठी ती जास्तीत जास्त बिझी राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नताशा हिने काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटो आणि व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या याचा मुलगा अगस्त्य आणि नताशा दिसत आहेत. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.