सोन्याचे भाव कोसळले, सोने खरेदीसाठी जात आहात? सावधान, तज्ज्ञांचा मोठा सल्ला, थेट सोन्याचा भाव चार पाच दिवसात..
Gold Silver Crash : सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. सोने सातत्याने कोसळताना दिसत आहे. त्यातच आता तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला. पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात अजून घसरण होण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या किंमती कोसळताना दिसत आहेत. ज्याचा कोणी विचारही केला नाही, इतक्या सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 180779 प्रति 10 ग्रॅम पोहोचला होता. आता धापकन किंमती पडल्या आहेत.
त्यातच आता 1 लाखापेक्षाही किंमती खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांनी सोने आताच खरेदी करण्याचा सल्ला दिला. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 124940 शुक्रवारी होता. सोन्यात 59000 घसरण झाली.
जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचा भाव घसरल्याचे बोलले जात आहे. यूएस फेड रिझर्व्हकडून व्याज दर वाढवला जात आहे. जागतिक बाजाात सोने त्याच्या निचांक पातळीवर आले.
तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात सोन्याचा भाव अजून घसरून शकतो. रूपये आणि डॉलर आमने सामने येऊ शकतो. सराफा बाजारासाठी आनंदाची बातमी येताना दिसत नाहीये. सोने चार पाच दिवसात अधिक स्वस्त होण्याचा अंदाज आहे.
सोन्यावरील दबाव वाढत आहे. शिवाय पुढील काही दिवसाच सोने अधिक कोसळणार असल्याचा अंदाज असल्याने ग्राहकांकडून सोने खरेदी म्हणावी तेवढी केली देखील जात नाहीये.