
हिना खान हे नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. हिना खान ही तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. हिना खान बऱ्याच वेळा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील असते.

हिना खान हिने आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले. इतकेच नाही तर ती थेट बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती.

नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आहे. या फोटोमध्ये हिना खान ही रोहित शेट्टी याच्यासोबत दिसत आहे.

एका फोटोमध्ये हिना खान ही चक्क अजगराची किस घेताना दिसत आहे. खतरो के खिलाडी 13 मध्ये चॅलेंजर म्हणून हिना खान ही सहभागी झालीये.

हिना खान हिला खरी ओळख ही अक्षराच्या भूमिकेतूनच मिळालीये. हिना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.