३० गुंठ्यामध्ये ४० क्विंटल बाजरीचे उत्पादन, अडीच ते तीन फुटाचे बाजरीचे कणीस

शेतकऱ्यांनी शेती करण्याची पद्धत बदलल्यापासून त्यांचा फायदा होत आहे. अहमदनगरच्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात तुर्कीची बाजरी चांगलीचं फुलवली आहे. अडीच ते तीन फुटाचे बाजरीचे कणीस पाण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.

| Updated on: Sep 13, 2023 | 2:24 PM
1 / 5
संगमनेर तालुक्यातील देवकवठे गावचे प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाळकृष्ण गाजरे यांनी आपल्या शेतामध्ये राजस्थानहून आणलेल्या तुर्की जातीच्या बाजरी बियाण्याची लागवड केली आहे.

2 / 5
 दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय गाजरे यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत स्वतः च्या ३० गुंठे शेतात १ किलो तुर्की जातीच्या बाजरी बियाणाची पेरणी करून ३०  गुंठे शेती शिवार फुलवला आहे.

3 / 5
साधारणपणे ३० गुंठ्यामध्ये त्यांना ४० क्विंटल बाजरीचे उत्पादन अपेक्षित आहे.अतिशय कमी पाण्यामध्ये हे बाजरीचे पीक येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

4 / 5
साधारणपणे या बाजरीच्या एका झाडाला तब्बल अडीच ते तीन फुटाचे बाजरीची कणीस येत आहेत.आपल्या कायमच्या बाजरी पिकापेक्षा या तुर्की बाजरीचे भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना या तुर्की बाजरी पासून नक्कीच फायदा मिळू शकतो असा विश्वास प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय गाजरे यांनी सांगितले.

5 / 5
यंदा जूनमध्ये पाऊस पडला नाही, त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिना पूर्णपणे वाया गेला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती आहे.