शहरांच्या नावांपासून बनलेलं सुपरहिट मराठी गाणं, या गाण्याची क्रेझ इतकी होती की देशभरात…
जुनी मराठी गाणी आजही रसिकांच्या लक्षात आहेत. ‘फटाकडी’ चित्रपटातील ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ हे त्यापैकीच एक लोकप्रिय गाणे आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्यावर रेखा दिसतात. बाळ पळसुले यांनी संगीत दिले असून, जगदीश खेबुडकर यांनी गीत लिहिले आहे. गाण्यात हनिमूनच्या ठिकाणांची मजेशीर यादी आहे.

या गाण्याची खासियत म्हणजे त्यात विविध शहरे आणि पर्यटनस्थळांची नावे येतात. लोणावळा, खंडाळा, पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीर अशी ठिकाणे गाण्यात ऐकायला मिळतात. त्यामुळे गाण्याला वेगळीच रंगत आली आहे.
नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी कुठे जावे, याचा विचार गाण्यातून करताना दिसते. वेगवेगळ्या ठिकाणांची नावे घेत हा प्रवास मजेशीर पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे गाणे ऐकताना एक वेगळाच प्रवास अनुभवायला मिळतो. मराठी गाणं असलं तरी देशभरातील चाहते हे गाणं ऐकतात.
हे गाणे अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. मराठी चित्रपटातील त्यांचा हा खास लावणी अंदाज लक्षवेधी ठरला. त्यामुळे गाण्याला आणखी लोकप्रियता मिळाली.
गाण्याला आशा भोसले यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या आवाजामुळे गाण्यातील उत्साह आणि खट्याळपणा अधिक खुलतो. आजही त्यांचा आवाज गाण्याची खास ओळख आहे.
1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’मधील हे गाणे आजही चर्चेत असते. त्याची मजेशीर मांडणी आणि वेगळी संकल्पना रसिकांना आवडते. त्यामुळे जुन्या मराठी गाण्यांच्या यादीत त्याचे स्थान कायम आहे.