70 च्या दशकातील सुहागरातवर आधारित गाणं, ज्यात विना ब्लाऊज अभिनेत्रीने दिलेला सीन, चित्रपट ठरला वादग्रस्त
70 च्या दशकात सुहागरातवर आधारित गाणं. ज्यामधील अभिनेत्रीच्या बोल्ड सीनने घातला होता धुमाकूळ, विना ब्लाऊज दिला होता सीन. चित्रपट सापडला होता वादातच्या भोवऱ्यात.

1978 साली प्रदर्शित झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटाने त्या काळात प्रचंड चर्चा आणि वाद निर्माण केले होते. दिग्दर्शक राज कपूर यांच्या या चित्रपटात अभिनेत्री जीनत अमान हिने साकारलेली ‘रूपा’ ही भूमिका प्रचंड गाजली पण त्याचबरोबर वादाच्या भोवऱ्यातही सापडली.

या चित्रपटात जीनत अमानच्या बोल्ड लूकमुळे आणि सादरीकरणामुळे अनेकांनी टीका केली. त्या काळात इतक्या धाडसी पद्धतीने एखाद्या अभिनेत्रीला दाखवणे हे प्रेक्षकांसाठी नवीन आणि धक्कादायक होते. यामधील काही सीनमध्ये कॅमेऱ्याचा फोकस तिच्या शरीरावर जास्त असल्याचा आरोप करण्यात आला.

या संदर्भात दिवंगत अभिनेते देव आनंद यांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी या चित्रपटाला ‘गंदी फिल्म’ असे म्हटले होते. मात्र, या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करत जीनत अमान आपल्या भूमिकेबद्दल पूर्णपणे आत्मविश्वासात होती.

चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यापैकी सुहागरातवर चित्रित केलेले ‘सैंया निकस गए... मैं ना लड़ी थी’ हे गाणे विशेष चर्चेत राहिले. या गाण्यात जीनत अमानच्या अभिनयाने आणि बोल्ड लुकने खळबळ उडवली होती.

या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अश्लीलता पसरवल्याचे आरोपही करण्यात आले होते. जीनत अमानने या चित्रपटात एका साध्या गावातील मुलीची भूमिका साकारली होती. मात्र तिचा वेशभूषा, डीप नेकलाइन असलेला ब्लाउज, त्या काळात खूपच बोल्ड मानला गेला आणि त्यामुळेच चित्रपट अधिक चर्चेत आला.