Gaurav More Photo : चाळीतून अलिशान फ्लॅटमध्ये… फिल्टर पाड्याचा बच्चन अर्थात गौरव मोरेचं घर पाहिलं का?

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेने नुकताच पवईतील म्हाडाच्या नवीन घरात गृहप्रवेश केला, जिथे 'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी नेमप्लेट लक्ष वेधून घेते. तसंच, प्रियांका कारेकरसोबत त्याच्या लग्नाची गोड बातमीही चाहत्यांना मिळाली. स्वतःच्या मेहनतीने घर घेण्याचा आणि लग्नगाठ बांधण्याचा गौरवचा आनंद सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट दिसतोय, चाहते आणि इंडस्ट्रीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Apr 07, 2026 | 3:00 PM
1 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरांत पोहोचलेला  सर्वांचा लाडका 'फिल्टर पाड्याचा बच्चन' अर्थात गौरव मोरे आणि त्याच्या चाहत्यांसाठी सध्या आनंदाचे दिवस आहेत. काही दिवसांपूर्वी गौरवला पवईमध्ये म्हाडाचं घर लॉटरीमध्ये मिळालं. नुकताच त्याने त्या घरात प्रवेश केला आणि यासोबतच चाहत्यांना डबल गुड न्यूज मिळाली ती गौरव मोरेच्या लग्नाची. ( Photo : Instagram / Social Media)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरांत पोहोचलेला सर्वांचा लाडका 'फिल्टर पाड्याचा बच्चन' अर्थात गौरव मोरे आणि त्याच्या चाहत्यांसाठी सध्या आनंदाचे दिवस आहेत. काही दिवसांपूर्वी गौरवला पवईमध्ये म्हाडाचं घर लॉटरीमध्ये मिळालं. नुकताच त्याने त्या घरात प्रवेश केला आणि यासोबतच चाहत्यांना डबल गुड न्यूज मिळाली ती गौरव मोरेच्या लग्नाची. ( Photo : Instagram / Social Media)

2 / 8

गौरवच्या घराचं इंटिरिअरचं काम पूर्ण झाल्यावर त्याने नुकताच गृहप्रवेश केला. पण घरात शिरण्याधी सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते घराबाहेरच्या पाटीने. 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असं लिहीलेली पाटी त्याने घराबाहेर लावली आहे. सोशल मीडियावर गौरवच्या घराचे फोटो, व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

3 / 8

काही दिवसांपूर्वी घराचा ताबा मिळाला तेव्हा गौरवने पोस्ट शेअर केली होती. (ताडपत्री ते फ्लॅट) फ़िल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली, असं त्याने म्हटलं होतं. तुम्ही तुमचं मूळ विसरुन चालत नाही. घर इतकं भारी बनेल असं मलाही वाटलं नव्हतं. मी फिल्टरपाड्यातून आलोय हे माझ्या कायम लक्षात राहिलं पाहिजे म्हणूनच ती ( 'फिल्टरपाड्याचा बच्चन' ) नेमप्लेट दिली, असं गौरवने सांगितलं.

4 / 8

नवीन घरात आल्याचा, स्वत:च्या बळावर घर घेतल्याचा आनंद गौरवच्या चेहऱ्यावर साफ झळकत होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकाचे स्वप्न असते का स्वत:च्या हक्काचे सुंदर असे घर असावे. आता गौरव मोरेचे हे स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरह घराचे काही फोटो टाकत आनंद व्यक्त केला.

5 / 8

याचसोबत चाहत्यांना गौरवच्या लग्नाचीही गुड न्यूज मिळाली. गौरवने त्याची मैत्रीण प्रियांका कारेकर हिच्याशी लग्न केलं आहे. प्रियंकाचा सुद्धा मनोरंजन विश्वाशी संबंध असून तिने आर. बाल्की, गौरी देशपांडे यांसारख्या दिग्गज बॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम केलंयं

6 / 8

गौरव आणि प्रियाका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ऋतुजा बागवेने केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना समजली. नवं घर आणि लग्न यांची बातमी समजताचा चाहते, गौरवचे मित्र, इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.

7 / 8

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनवीही गौरवसाठी खास पोस्ट लिहीत त्याचं अभिनंदन केलं. ' पवई मधला सुंदर टू बीएचके.... अफलातून इंटिरियर.... ज्यांच्यामुळे आपण उभे आहोत त्यांचं दर्शनी भागातलं अधिष्ठान... प्रवेशद्वारावर आपण जिथून आलोय तिथली खूण सांगणारी " फिल्टरपाड्याचा बच्चन" ही अतिशय गोड आणि हटके पाटी... घरभर कार्पोरेट जगतातली नाही तर आयुष्यभर सुखदुःखामध्ये उभी राहिलेली अतिशय जिवाभावाची माणसं... त्यांच्या प्रेम आणि कौतुकाने आनंदून गेलेला गौरव अन आपल्या लेकाचं कर्तृत्व आणि कौतुक न्याहाळत तृप्त झालेली आई... मजा आली.. कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक मराठी कलाकार निव्वळ आपल्या मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करतो तेव्हा भारी तर वाटणारच....' असं त्यांनी लिहीत गौरवला शुभेच्छाही दिल्या.

8 / 8

गौरवच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा पाऊस पडला असून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us