हॉटेलची रूम बूक करताना कोणत्या चुका टाळाव्यात ?

Hotel Room Booking Tips : हॉटेल रूम्स बूक करताना अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे किस्से समोर आले आहेत. स्कॅमर्सनी अनेकांना लाखोंचा चुना लावलाय. तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील, फसवणूक टाळायची असेल तर बूकिंग करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

| Updated on: Mar 02, 2026 | 2:08 PM
1 / 9
ऑफीसच्या कामासाठी किंवा कुठे फिरण्यासाठी बाहेर जायचं झालं तर कोणीही हॉटेल बूक करून तिथे राहणं पसंत करतं. हे अतिशय कॉमन आहे. आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार  हॉटेलची रूम बूक करून लोकं तिथे राहतात.( Photo Credit: Getty Images)

2 / 9
पण हेच बूकिंग करताना एखादी जरी चूक झाली तर त्यामुळे मोठी अडचण  होऊ शकते. आजकाल हॉटेल रूम्स बूक करताना बऱ्याच जणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये काही लोकांना लाखोंचा चुनाही लागला. ( Photo Credit: Getty Images)

3 / 9
हॉटेल रूम बूक करताना लोकांसोबत स्कॅम होऊ शकतं, नुकतंच अंदमानमध्ये एक व्यक्ती बूकिंग करत असताना  त्याची 6 लाखांची फसवणूक झाली. क्रेडिट कार्डवर 10% सूट देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी त्याच्या कार्डचे डिटेल्स चोरले आणि ही फसवणूक केली. ( Photo Credit: Getty Images)

4 / 9
आपली अशी फसवणूक होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हॉटेलची रूम बूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रूम बूक करत असाल तेव्हा व्हेरिफाईड पोर्टलचा वापर करा. त्या योग्य आहेत ना याची आधी नीट खात्री करून घ्या. ( Photo Credit: Getty Images)

5 / 9
हॉटेल बूकिंग करताना कोणत्याही पोर्टलवर तुमचे पेमेंट डिटेल्स कधीच सेव्ह करू नका. वारंवार पेमेंट डिटेल्स टाकण्यापेक्षा बरेच लोक ती माहिती सेव्ह करून ठेवतात. मात्र तुमची हीच सवय अतिशय धोकादायक ठरू शकते. ( Photo Credit: Getty Images)

6 / 9
हॉटेलमध्ये रूम बूक करताना कधीच पब्लिक वाय-फाय वापरू नका. नेहमी प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करूनच रूम बूक करावी. त्यामुळे तुमची व्यक्तीगत माहिती किंवा अन्य डिटेल्स लीक होण्याचा धोका कमी होतो.  ( Photo Credit: Getty Images)

7 / 9
लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सद्वारे वापरली जाणारी सर्वात सामान्य पद्धत म्हणजे त्यांना खोट्या ऑफरचे आमिष दाखवून अडकवणे. बऱ्याच वेळेस तुम्हाला अनोळखी मेलद्वारे अशा प्रकारची ऑफर दिली जाऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका. ( Photo Credit: Getty Images)

8 / 9
हॉटेल बूकिंग करताना वर नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि योग्य ती काळजी घ्या. म्हणजे कोणीही तुमची फसवणूक करणार नाही, गैरफायदा घेणार नाही, तुमचे नुकसान टळेल.  ( Photo Credit: Getty Images)

9 / 9
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. बूकिंग करताना  नेहमी योग्य ती काळजी घ्यावी.) ( Photo Credit: Getty Images)

Follow Us