High Bp | रक्तदाब कसा नियंत्रणात आणावा? रोज सकाळी करा या 4 गोष्टी

हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणणं खूप अवघड असतं. काय करावं आणि काय करू नये यात माणूस गोंधळून जातो. पथ्ये पाळताना सुद्धा कशी आणि कोणती पथ्ये नेमकी पाळली जावीत याचा एक वेगळा गोंधळ असतो. पण अशा काही सवयी आहेत ज्या सकाळी अवलंबल्या तर रक्तदाब नियंत्रणात आणला जाऊ शकतो. काय आहेत या सवयी?

| Updated on: Oct 07, 2023 | 1:34 PM
1 / 5
उच्च रक्तदाब, हाय बीपी, हाय ब्लड प्रेशर अनेक नावांनी हा आजार ओळखला जातो. या आजारात रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त रक्तवाहिन्यांवर दबाव आणते. या आजारात मूत्रपिंडाचा आजार, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक्स अशा अनेक समस्या उद्भवतात. पण सकाळी काही सवयीचा अवलंब केल्यास तुम्ही बीपी कंट्रोल करू शकता.

2 / 5
रात्री झोपेची आणि सकाळी उठायची वेळ ठरवा. झोपेचं वेळापत्रक फॉलो केल्यावर रक्तदाब नियंत्रणात राहील आणि मानसिक ताण कमी होईल पण हे वेळापत्रक पाळलं नाही तर त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.

3 / 5
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. हे पाणी जर लिंबू पाणी असेल तर उत्तम! दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने केल्यास रक्ताचे प्रमाण नियंत्रणात राहते याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4 / 5
आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे किंवा इतर कोणताही व्यायाम प्रकार करावा. सकाळची वेळ कसरत करण्यासाठी योग्य आहे.

5 / 5
चहा-कॉफीने दिवसाची सुरुवात अनेकजण करतात. या पेयांनी, कॅफीनमुळे अचानक रक्तदाब वाढतो. चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करणे किंवा सकाळी उठल्या-उठल्या ते पिणं बंद करणे हा एकमेव मार्ग आहे.