
दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तलावात देशी-विदेशी पक्षांनी हजेरी लावली आहे.

खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी, कानकात्रे आणि सूर्याची वाडी या ठिकाणी यंदा प्रथमच बार हेडेड गुज म्हणजेच पट्टेरी हंस या पक्षाचे दर्शन झाले आहे.

येरळवाडी, कानकात्रे आणि सूर्याची वाडी तलावात या आधी बऱ्याच वेळा फ्लेमिंगो हजेरी लावतात.

मात्र यंदा प्रथमच बार हेडेड गुज या पक्षाने हजेरी लावल्याने अनेक पक्षीप्रेमी या ठिकाणी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी दाखल होत आहेत.

यंदा तलावात मुबलक पाणीसाठा झाल्याने तलावाच्या उथळ, पाणथळ जागेत, अन्नाच्या शोधात असलेले अनेक पक्षी तलावाच्या ठिकाणी दिसत आहे.

त्यात पट्टेरी हंस, चक्रवाक, काळा अवाक, नंदीमुख बदक, काळा शराटी इत्यादी पक्षांचा समावेश आहे.

या तलावाच्या दक्षिणेला सुमारे 22 हंसाचा थवा विसावला आहे. हिरव्यागार गवतातील कीटक, पाणवनस्पतीवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत.