माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा दिलखेचक अंदाज, बॉलिवूडवर करतेय राज
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं कुटुंबिय राजकारणात सक्रिय आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ... शर्वरी नुकताच 'अल्फा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. फार कमी कालावधीत शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शर्वरी फक्त बॉलिवूड अभिनेत्री नाही तर, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात देखील आहे. शर्वरी कायम क्लाली आणि रॉयल लूकमुळे चर्चेत असते. आता देखील शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सध्या सर्वत्र शर्वरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

‘बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

शर्वरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. शर्वरीसाठी 2024 वर्षे लकी ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंज्या, महाराज आणि वेद या लागोपाठ रिलीज झालेल्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

शर्वरीने प्यार का पंचनामा 2 आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं. ‘दीवानी मस्तानी’ या प्रसिद्ध गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, दीपिका पदुकोणने साकारलेल्या ‘मस्तानी’च्या प्रवेशासाठी सेटवरील भव्य दरवाजे उघडण्याची जबाबदारी शर्वरीवर होती.