
अहमदनगर : लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या वर्षी राज्यातील दिग्गज नेत्यांची मुलं आणि मुली विवाहबंधनात अडकत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मुलं-मुलींची लग्ने थाटामाटात पार पडली. सध्या भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यांचादेखील विवाह झाला.

या विवाह सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

तर दुसरीककडे थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


हा विवाह सोहळा कर्डीले यांच्या बुऱ्हानगर येथिल गावात पार पडला.