Beed Crime : बीडमध्ये भरदिवसा थरार, चारचाकी गाड्यांतून आले, महिलेला घरातून उचललं, नेमकं काय घडलं?
Beed woman kidnapping case : बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरात भरदिवसा 35 वर्षीय महिलेचं घरातून अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या चौघांनी महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला असून चार आरोपी निष्पन्न झाले आहेत.

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातुन भर दिवसा 35 वर्षीय महिलेचे दोन चार-चाकी गाड्यांमधून अपहरण, अपहरणावेळचे फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत.
बीड ग्रामीण पोलिसांकडून तपासाला वेग, घटनास्थळाचा आज केला जाणार पंचनामा. चार आरोपी निष्पन्न, दोघांना नोटीसा बजावल्या तर दोन आरोपींचा शोध सुरू.
बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरातील एका 35 वर्षीय महिलेच्या घरी शुक्रवारी दुपारी चार आरोपी दोन चारचाकी गाड्या घेऊन दाखल झाले आणि अज्ञात कारणासाठी अपहरण करून गाडीत डांबून नेले.
पिडीतेच्या लहान मुलासह मुलीला देखील मारहाण करत जीवे मारण्याची दिली होती धमकी. शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातुन आरोपींच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आलेली आहे.
दरम्यान या अपहरणावेळीचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन चार-चाकी गाड्या आणि काही लोक दिसत आहेत, एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत बळजबरी गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.