Actors To Tv Host : मोठ्या पडद्यावर सुपरहिट, टीव्हीवरही हिट ! हे 9 स्टार्स ठरले लोकप्रिय होस्ट
बॉलिवूडचे कलाकार मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतातच, पण अनेक स्टार्सनी टेलिव्हिजनच्या दुनियेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहींनी लोकप्रिय रिॲलिटी शोचं सूत्रसंचालन केलं, तर काहींनी परीक्षक म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली. चला, जाणून घेऊया अशाच 9 बॉलिवूड स्टार्सबद्दल...

- ‘कौन बनेगा करोडपती’चा लोकप्रिय चेहरा – अमिताभ बच्चन यांनी 2000 साली ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. त्यांच्या दमदार आवाजाची आणि खास शैलीची प्रेक्षकांना भुरळ पडली. शोच्या लेटेस्ट 18व्या सीझनमध्येही ते सूत्रसंचालक म्हणून दिसत आहेत.
- ‘झलक दिखला जा’मध्ये परीक्षक म्हणून लोकप्रिय झालेली माधुरी दीक्षित आता मराठी क्विझ शो ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी तिने 2002 मध्ये ‘कहीं न कहीं कोई है’ या शोचे होस्टिंग केलं होते.
- सलमान खानने 2008 मध्ये ‘दस का दम’ या सेलिब्रिटी गेम शोमधून टीव्ही होस्टिंगला सुरुवात केली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनपासून तो या शोचा सूत्रसंचालक आहे. आता ‘बिग बॉस’च्या 20व्या सीझनमध्येही सलमान खानचीच पुन्हा एन्ट्री होणार आहे.
- अजय देवगण आता ‘क्राइम पेट्रोल 2026’चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या नव्या सीझनमध्ये त्याने अनूप सोनी याची जागा घेतली असून, 31 ऑगस्टपासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर हा शो सुरू होणार आहे.
- शाहरुख खानने 2007 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन केलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन पुन्हा शोमध्ये परतले. शाहरुखने पुढे ‘क्या आप पांचवीं पास से तेज हैं?’ आणि ‘जोर का झटका: टोटल वाइपआउट’ यांसारख्या शोचेही होस्टिंग केले.
- रणवीर सिंहने 2021 मध्ये ‘द बिग पिक्चर’ या व्हिज्युअल-बेस्ड क्विझ शोमधून टेलिव्हिजनवर होस्ट म्हणून पदार्पण केले. हा शो कलर्स टीव्हीवर प्रसारित झाला होता आणि त्याचा एकच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.
- कोरिओग्राफर फराह खानने 2004 मध्ये ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून टीव्ही प्रवास सुरू केला. त्यानंतर ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिए’, ‘जस्ट डान्स’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ यांसारख्या शोमध्ये ती दिसली. तसेच ‘बिग बॉस हल्ला बोल’ आणि ‘फराह की दावत’चे तिनं सूत्रसंचालन केलं.
- दिग्दर्शक करण जौहरने 2004 मध्ये ‘कॉफी विद करण’ या लोकप्रिय चॅट शोमधून टेलिव्हिजनवर प्रवेश केला. पुढे ‘झलक दिखला जा’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिकाही त्याने निभावली.
- रितेश देशमुखने 2013 मध्ये ‘इंडियाज डान्सिंग सुपरस्टार’मध्ये परीक्षक म्हणून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर ‘यारों की बारात’ आणि ‘विक्टा का उत्तर’ यांसारख्या शोचे सूत्रसंचालन केले. अलीकडेच तो ‘लॉकअप 2’ होस्ट करताना दिसला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us