
बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या अभिनेत्री केवळ अभिनयावरच अवलंबून नाहीत, तर या बॉलिवूडच्या सौंदर्यवर्ती साईड बिझनेसही करत आहेत. काहींनी रेस्टॉरंटचा बिझनेस सुरू केला आहे. तर काहींनी ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला आहे. पण बॉलिवूडच्या सर्वाधिक सौंदर्यवर्तींनी रेस्टॉरंट बिझनेस सुरू केला आहे. ज्या अभिनेत्री नाहीत, पण प्रसिद्ध अभिनेत्यांच्या सहचरिणी आहेत, अशा सौंदर्यवर्तींनीही साईड बिझनेस सुरू करून बक्कळ पैसा कमवायला सुरुवात केली आहे.

किंग खान शाहरुख खानची पत्नी कमाईच्या बाबतीत कुठेच कमी नाहीये. गौरीने फेब्रुवारी 2024मध्ये मुंबईच्या खार पश्चिममध्ये टोरीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तिचं हे रेस्टॉरंट सुशी, पकौडी, रेमन, सिग्नेचर कॉकटेलसाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून गौरी करोडो कमावत आहे.

रकूल प्रीत सिंगने एप्रिल 2024मध्ये हैद्राबाद, चेन्नई, बंगळुरू आणि पुण्यात आऊटलेटसह स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. पारंपारिक केळ्याच्या पानावर देण्यात येणारा रागी डोसा आणि जुन्नू सारखे पदार्थ हे या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्ये आहे.

सनी लियोनने तर चक्क नोएडात जानेवारी 2024मध्ये चिका लोका लॉन्च केला होता. तिने रेस्टॉरंट मालक साहिल बावेजासोबत टायअप करून हे रेस्टॉरंट सुरू केलं. या ठिकाणचं कोकोनट मार्गरिटा, ब्लॅक चीज मोमोज, स्प्रिंग रोल आणि भट्टीतील पनीर खास आहे.

मलायका अरोरा, तिचा मुलगा अरहान खान आणि रेस्टॉरंट मालक धवल उदेशी यांनी मुंबईतील पाली व्हिलेजमध्ये आकर्षक कॅफे स्कारलेट हाऊस लॉन्च केलंय. या कॅफेतील मलाइकाची फेव्हरेट बेक्ड मच्छी खास आहे.