रतन टाटा ते आनंद महिंद्र यांच्यापर्यंत, हार्वर्डमधून शिकलेत हे 7 प्रसिद्ध भारतीय दिग्गज

जगभरात शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकेची हार्वर्ड युनिव्हर्सिटी सध्या चर्चेत आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाविरुद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटी कोर्टात गेली आहे.या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून अनेक भारतीय दिग्गज व्यक्तीमत्व शिकली आहेत. कोण आहेत ही व्यक्तीमत्व ते पाहूयात....

| Updated on: May 24, 2025 | 3:42 PM
1 / 7
राहुल बजाज - दिवंगत उद्योजक राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांनी मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. हायस्कूल पूर्ण केल्यानंतर, त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि नंतर मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयातून पदवीपूर्व शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेले. राहुल बजाज बजाज समूहाचे अध्यक्ष आणि संचालक होते.२०२२ मध्ये त्यांचे निधन झाले.

2 / 7
 कपिल सिब्बल - कपिल सिब्बल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४८ रोजी पूर्व पंजाबमधील जालंधर येथे झाला.त्यांचे शालेय शिक्षण सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये झाले. १२ वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये पदवीपूर्व शिक्षण घेतले. नंतर, त्यांनी दिल्ली विद्यापीठातील कायदा विद्याशाखेत वकीलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. कपिल सिब्बल हे एक भारतीय वकील, राजकारणी आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत

3 / 7
 पी. चिदंबरम - पलानीअप्पन ऊर्फ पी. चिदंबरम यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४५ रोजी चेन्नईतील कंदनूर येथे झाला. त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक शाळेत घेतले. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण घेतले. नंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. आणि लोयोला महाविद्यालयातून कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण (एमए) पूर्ण केले. पलानीअप्पन चिदंबरम सध्या एक भारतीय राजकारणी आणि वकील आहेत.ते काँग्रेसचे नेते असून माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केले आहे.

4 / 7
जयंत सिन्हा - जयंत सिन्हा यांचा जन्म २१ एप्रिल १९६३ रोजी तत्कालिन बिहारच्या गिरिडीह येथे झाला.त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पाटण्यातील सेंट मायकल हायस्कूल आणि दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमध्ये केले.त्यांनी १२ वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमधून बी.टेक केले. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एमएस आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. जयंत सिन्हा यांनी भारतीय संसदेचे सदस्य म्हणून काम केले आहे आणि भारत सरकारमध्ये माजी अर्थ राज्यमंत्री आणि माजी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून पदे भूषवली आहेत.

5 / 7
सुब्रमण्यम स्वामी- सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटिश भारतातील मद्रास प्रेसिडेन्सीतील मैलापूर येथे झाला. त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आणी बीए केले. नंतर, त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून एमए आणि हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ आहेत.त्यांनी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गणितीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.

6 / 7
रतन टाटा - दिवंगत उद्योजक रतन नवल टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी  मुंबईत झाला. त्यांनी कॅम्पियन स्कूल, द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल यासारख्या अनेक शाळांमध्ये शिक्षण घेतले.पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. रतन नवल टाटा हे दानशूर  भारतीय उद्योगपती होते. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी देशविदेशात टाटा उद्योग पोहचविला.

7 / 7
आनंद महिंद्रा - आनंद गोपाळ महिंद्रा यांचा जन्म १ मे १९५५ रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षणासाठी लव्हडेल येथील लॉरेन्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पदवीपूर्व पदवीसाठी फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. आनंद महिंद्रा हे एक भारतीय उद्योगपती असून ते महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आहेत.