
फुकरे 3 या चित्रपटाला रिलीज होऊन आता 19 दिवस झाले. विशेष म्हणजे जवान या चित्रपटाच्या पुढे फुकरे 3 चित्रपट टिकून आहे. फुकरे 3 ने धमाका केला.

फुकरे 3 चित्रपटाने ओपनिंग जबरदस्त केली. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली.

फुकरे 3 चित्रपटाचे आता नुकताच 19 व्या दिवसाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पुढे आले. आता या चित्रपटाची हवा कमी झाल्याचे बघायला मिळतंय.

या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. फुकरे 3 चित्रपटाने 19 व्या दिवशी 80 लाख रूपये कमाई केली. पुढील काही दिवस चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.

फुकरे 3 चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. चित्रपटाने आतापर्यंत 91.63 कोटींचे कलेक्शन केले आहे.