Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीला फॉलो करा अभिनेत्रींचा खास लूक, फुलून दिसेल तुमचंही सौंदर्य

Ganesh Chaturthi 2026 : सध्या सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. पण सणांच्या दिवशी महिलांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लूक कोणता चांगला दिसेल, अशात तुम्ही काही प्रसिद्ध अभिनेत्रींचा लूक फॉलो करु शकता. तर पिवळ्या रंगामध्ये देखील तुम्ही खास लूक करु शकता...

| Updated on: Sep 12, 2026 | 3:13 PM
1 / 5
गणेशोत्सवासाठी तुम्ही कीर्ती सुरेशचा लूक फॉलो करु शकता. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसेल.  तिने व्ही-नेकलाइन आणि बांधणी प्रिंट असलेली पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

गणेशोत्सवासाठी तुम्ही कीर्ती सुरेशचा लूक फॉलो करु शकता. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसेल. तिने व्ही-नेकलाइन आणि बांधणी प्रिंट असलेली पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

2 / 5

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिचा लूक देखील तुम्ही फॉलो करु शकता. यासाठी तुम्ही प्रिंटेड शॉर्ट कुर्ती शिवून घेऊ शकता, ज्यासोबत तुम्ही प्लेन फॅब्रिकचा पलाझो घालू शकता. शिफॉन फॅब्रिकच्या फ्लोइंग दुपट्ट्याने तुम्ही हा लूक पूर्ण करु शकता.

3 / 5

रूपाली गांगुलीच्या सूटची डिझाइन गणेशोत्सवासाठी खास ठरेल. कुर्त्याच्या नेकलाइनसोबतच दुपट्ट्यालाही एक जड बॉर्डर देण्यात आली आहे. अभिनेत्रीने आपला हा लूक वेव्ही सॉफ्ट हेअर आणि स्टेटमेंट इअररिंग्सने पूर्ण केला आहे.

4 / 5

श्वेता तिवारीप्रमाणे पिवळ्या रंगाचा आरशाचे काम असलेला सूट तयार करून घेऊ शकता. यासोबत मॅचिंग शरारा दिला आहे. अभिनेत्रीने नैसर्गिक मेकअप केला असून जड कानातल्यांनी आपला लूक अधिक खुलवला आहे.

5 / 5

सोनारिका भदौरियाचा हा लूक हलकाफुलका आणि ट्रेंडी आहे. सूटची शिलाई काश्मिरी शैलीत केली आहे. अभिनेत्रीने यासोबत एक स्ट्रेट लाइन पलाझोल घतला आहे आणि वक्र काठांच्या हलक्या वजनाच्या दुपट्ट्याने हा लूक पूर्ण केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us