ढोल-ताशांचा आवाज, गुलालाची उधळण अन्…; विसर्जन मिरवणुकीत न्हाले मुंबईकर

जगभरात ख्याती असलेला लालबागचा राजाची विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. सध्या ठिकठिकाणी लालबागचा राजावर गुलालाची उधळण केली जात आहे.

| Updated on: Sep 17, 2024 | 2:10 PM
1 / 10
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

2 / 10

गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घालत गणरायाला निरोप दिला जात आहे.

3 / 10

मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरुवात झाली आहे. मोठ्या थाटामाटात, ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत बाप्पाची राजेशाही मिरवणूक सुरु आहे.

4 / 10

जगभरात ख्याती असलेला लालबागचा राजाची विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. सध्या ठिकठिकाणी लालबागचा राजावर गुलालाची उधळण केली जात आहे.

5 / 10

तर दुसरीकडे लालबागचा राजासह अनेक मोठमोठे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक हे लालबाग-परळमध्ये दाखल झाले आहेत.

6 / 10

सध्या मुंबईतील अनेक चौपाट्यांवरही गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. बाप्पाचं मोहक रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच अनेक भक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

7 / 10

मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, मढ आणि इतर चौपाट्यावर गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

8 / 10

आज मुंबईत ठिकठिकाणी 9 अप्पर पोलीस आयुक्त,40 डीसीपी, 56 एसीपी दर्जाचे अधिकारी बंदोबस्त ठेवणार आहेत. तर 20 हजारहून अधिक पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी असतील.

9 / 10

गणपती बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईतील विविध चौपाट्यांवर 761 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे. तसेच ४८ मोटरबोटी तैनात आणि २३ हजार ४०० पोलीस कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

10 / 10

(सर्व फोटो - लालबागचा राजा युट्यूब)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us