हापूस आंब्यात गणपती बाप्पा, आगमनापूर्वीच भक्तांना दिलं दर्शन; फोटो तर पहाच
आता सर्वांना गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. अनेक कारखान्यांमध्ये गणराया आकार घेत आहे... अनेक परदेशात देखील गणपती पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याआधीच बाप्पाने भक्तांना दर्शन दिलं आहे... हापूस आंब्यात गणराया दिसल्याने सर्वच चकित झाले आहेत.

पुण्यातील सिंहगड पायथ्याच्या निगडे मोसे येथील ऐतिहासिक शिवशंभू शिल्प सृष्टीतील हापूस आंब्याच्या झाडाला श्री गणेश मुर्तीच्या आकाराचा आंबा आढळून आलाय. निसर्गाच्या हा अनोखा नजराणा पाहून शेतकरी, कृषी तज्ज्ञ अचंबित झाले आहेत.

इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे हे नेहमी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची दैनंदिन पुजा करण्यासाठी गेले असताना शिल्प सृष्टीतील शिवकालीन वस्तु संग्रहालयाच्या इमारती समोर असलेल्या हापूस जातीच्या आंब्याच्या झाडाखाली हा गणेश मुर्तीच्या आकारा सारखा आंबा त्यांना आढळून आला..

या आंब्याचे वजन सुमारे शंभर ग्रॅम इतके असून आंब्याचा वरील भाग गणेशमूर्तीच्या कपाळासारखा तर मध्यभाग ते देडा पर्यंतचा भाग सोंडेच्या आकाराचा आहे.

राजगड तालुका कृषी अधिकारी सुनील ईडोळे पाटील म्हणाले, हुबेहूब श्री गणपतीच्या आकाराचा आंबा तयार होणे हा केवळ योगायोग आहे. शास्त्रीय कारणानुसार या झाडाला कमी प्रमाणात नेत्र अन्नद्रव्ये मिळत असावी. तसेच जनुकीय बदलामुळे आंब्याचे एक फळ श्री गणपतीच्या आकारा सारखे तयार झाले आहे.

इतर फळांचा आकार मात्र नैसर्गिकरित्या तयार आंबा होणाऱ्या आंब्या प्रमाणे आहे. गणपतीच्या आकाराचा हा आंबा संशोधनासाठी कृषी विभागाला देण्यात येणार आहे. तसेच या आंब्याची कोय पावसाळ्यात लावली जाणार आहे.. असं शिवशंभू शिल्प सृष्टीचे कार्यवाहक रोहित नलावडे सांगितले आहे.