Gautami Patil: मुझे पसंद है भाई… गौतमी पाटील पहिल्यांदाच मनातलं बोलली, खरं सांगूनच टाकलं

Gautami Patil: नृत्यांगना गौतमी पाटीलने नुकताच एका मुलाखतीमध्ये मनातील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. ती मुझे पसंद है भाई असं कोणाविषयी बोलली जाणून घ्या...

| Updated on: Jun 14, 2026 | 9:12 AM
1 / 5
नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या मादक अदांसाठी विशेष ओळखली जाते. तिच्या अदा अनेकांना घायाळ करतात. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. आता तर गौतमीने काही अल्बममध्ये काम केले आहे. ती काही चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. दरम्यान, गौतमी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

गौतमी पाटील काही दिवसांपूर्वी एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाने नृत्य सादर करण्यासाठी पोहोचली होती. तिने बैलासमोर डान्स केला होता. या डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीवर जोरदार टीका झाली होती.

3 / 5

नुकताच एका मुलाखतीमध्ये गौतमीला भविष्यात असे कार्यक्रम पुन्हा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, "हो, करणार मी. काय अडचण आहे? मुझे पसंद है भाई. हे चांगलं आहे" असे स्पष्ट मत मांडले आहे.

4 / 5

गौतमी पुढे म्हणाली, "लोकांचं काय बोलणं आहे, बोलू दे. मला काय म्हणायचं आहे, मला जे ट्रोल करतात त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे म्हणून ते करतात. संपला विषय."

5 / 5

गौतमीने पुढे "जे माझ्यावर भरभरून प्रेम करतात ते मला भरभरून प्रेम देतात आणि जे ट्रोल करतात त्यांना माझं अगोदर उत्तर देऊन मोकळे होतात" असे स्पष्ट मत मांडले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us