AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वीच ‘जोर का झटका’, एका झटक्यात दोन खेळाडू संघाबाहेर, असं काय घडलं?

IND vs NZ ODI Sqaud Changes: भारत न्यूझीलंड वनडे मालिका सुरु होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच आता संघात दोन बदल करण्यात आले आहे.

IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वीच 'जोर का झटका', एका झटक्यात दोन खेळाडू संघाबाहेर, असं काय घडलं?
| Updated on: Nov 02, 2026 | 8:31 AM
Share

IND vs NZ ODI Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांची तयारी सुरू करणार आहेत. यापूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन खेळाडू या मालिकेतून बाहेर पडल्याने, न्यूझीलंडला आपल्या एकदिवसीय संघात बदल करण्यास भाग पडले आहे.

पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यासाठीचा संघ आधीच जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, न्यूझीलंडचे मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र अद्याप त्यांच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेले नाहीत, असे समोर आले आहे. हे दोन्ही खेळाडू टी-२० मालिकेतही खेळतील अशी अपेक्षा होती, परंतु दुखापतींमुळे ते बाहेर राहिले. आता एकदिवसीय मालिकेतही त्यांचा सहभाग जवळपास अशक्य वाटत आहे. मार्क चॅपमनला हॅमस्ट्रिंगचा ताण आला आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अंदाजे दोन आठवडे लागतील, असे वृत्त आहे. रचिन रवींद्रचा एका प्रमोशनल शूटदरम्यान त्याचा खांदा निखळला आहे. त्याला मैदानावर परतण्यासाठी काही वेळ लागेल.

दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केले आहे की, टिम सायफर्टचा पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेत डावाची सुरुवात केली होती आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. यापूर्वी, त्याचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता. याचा अर्थ सायफर्ट आता संपूर्ण पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. याशिवाय, क्रिकेट बोर्डाने हेन्री निकोल्स आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांचाही संघात समावेश केला आहे. निकोल्स फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, तर फॉक्सक्रॉफ्ट शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळेल. मॅट फिशरदेखील आता सर्व सामन्यांमध्ये खेळू शकतो. यापूर्वी तो फक्त शेवटचे दोन सामने खेळत होता, पण आता त्याचा पहिल्या तीन सामन्यांसाठीही संघात समावेश करण्यात आला आहे.

Follow Us
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा