Gautami Patil: मी फक्त लावणी नाही करत… माधुरी दीक्षितसमोर गौतमी पाटील असं काय म्हणाली?

अभिनेत्री माधुरी दीक्षितचा 'कोण होणार करोडपती' हा शो टेलिव्हिजनवर सुरू झाला आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड, मराठी कलाकारांनीही उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली.
या शोमध्ये नुकतीच शिव ठाकरे आणि गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे. याचे प्रोमो सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माधुरी दीक्षितने शिव आणि गौतमीचं स्वागत केले आणि आपल्याला आजचा शो कातिल करायचा आहे असं गौतमीच्या स्टाइलने सांगितलं. त्यानंतर गौतमीनं पाटलांचा बैलगाडा या तिच्या गाण्यावर डान्सही केला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्रोमोमध्ये गौतमी माधुरी दीक्षितला सांगताना दिसतेय की, "गौतमी नाव आलं की लोक आपसूक लावणी असंच म्हणतात. मी उलट माझ्या कार्यक्रमात फक्त एकच लावणी करते. बाकी सगळे वेस्टर्न असतं किंवा माझे स्वतःचेच गाणे आहेत, ते मी करते. मला आता हे सांगायचे आहे की मी फक्त लावणी कलाकार नाहीये."
शिव ठाकरे आणि गौतमी पाटीलचा एपिसोड 31 ऑक्टोबर रोजी हा रात्री 9 वाजता सोनी मराठीवर टेलिकास्ट होणार आहे. याचे प्रोमो मात्र लोकांच्या भेटीला आले आहेत.