जिनिलीयाने पहिला मराठी चित्रपट कोणता पाहिलेला? नाव ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक

मराठी अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीयाची जोडी गेल्या अनेक दिवासांपासून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. पण तुम्हाला माहिती आहे का जिनिलीयाने पहिला मराठी चित्रपट कोणता पाहिला होता? नाव ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक.

| Updated on: Jul 20, 2026 | 6:12 PM
1 / 5
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी मानली जाते. जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी विवाह केला. देशमुख कुटुंबाची सून झाल्यानंतर जिनिलीयाने मराठी संस्कृती, परंपरा आणि भाषा मनापासून स्वीकारली.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी मानली जाते. जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी विवाह केला. देशमुख कुटुंबाची सून झाल्यानंतर जिनिलीयाने मराठी संस्कृती, परंपरा आणि भाषा मनापासून स्वीकारली.

2 / 5

आज ती उत्तम मराठी बोलताना अनेकदा पाहायला मिळते. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' या चित्रपटातून जिनिलीयाने अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या 'श्रावणी' या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक झाले.

3 / 5

मात्र, मराठीत अभिनय करण्यापूर्वी तिने पाहिलेला पहिला मराठी चित्रपट कोणता होता, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. जिनिलीयाने सांगितले की, रितेशने तिला सर्वप्रथम 'जोगवा' हा चित्रपट दाखवला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'जोगवा'सारखा वास्तववादी आणि प्रभावी चित्रपट मी याआधी कधीच पाहिला नव्हता. हा चित्रपट आणि त्यातील संगीत दोन्ही मनाला भिडणारे आहे.'

4 / 5

यावेळी रितेश देशमुखनेही या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, 'जोगवा' पाहिल्यानंतर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील यांना फोन करून चित्रपटाचे कौतुक केले होते. त्याच वेळी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

5 / 5

पुढे राजीव पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि तेच आपल्या मराठी कारकिर्दीतील पहिले दिग्दर्शक ठरल्याचे रितेशने सांगितले. तसेच, राजीव पाटील आज आपल्यात नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us