
जिनिलिया Filmymantra Media सोबत बोलताना म्हणाला की, जेव्हा लोकांना समजल मी 'सितारे जमीन पर' चित्रपटात काम करतेय. त्यावेळी प्रत्येकजण म्हणाला ओह माय गॉड, किती लकी आहेस, तू आमिर खानचा चित्रपट करतेस.

मी त्यावर बोलली हा आमिर सरांचा ग्रेटनेस आहे. त्यांनी माझ्यात काहीतरी पाहिलं आणि माझं ऑडिशन घेतलं. तुम्ही सुद्धा असं करु शकता. एखादा रोल मला ऑफर करु शकता. पण तुम्ही नियमांनुसारच पुढे जाता.

तुम्हाला असं वाटत असेल, माझं लग्न झालय. त्यामुळे मला या कॅरेक्टरची गरज नाही. जिनिलिया पुढे म्हणाली की, "मला वाटतं फिल्ममेकिंग आता बदलली आहे. त्यामुळे आपले विचार सुद्धा बदलले पाहिजेत. तुम्हाला एखादी व्यक्तीरेखा एका ठराविक वयाची दाखवायची असेल, तर तुम्ही त्याच वयाच्या व्यक्तीला कास्ट केलं पाहिजे"

जेव्हा तुम्ही कुठल्या अशा अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला कास्ट करता जो वयामध्ये चित्रपटातल्या कॅरेक्टरच्या त्या वयापेक्षा लहान आहे, तेव्हा त्याला छोट्या-छोट्या गोष्टी समजत नाहीत. योग्य कास्टिंग आवश्यक आहे. सर्वांना सधी मिळेल अशी अपेक्षा आहे असं जिनिलिया म्हणाली.

जिनिलिया डिसूझाने तिच्या लेटेस्ट इंटरव्यूमध्ये बॉलिवूडला सुनावलं आहे. जिनिलिया डिसूझाने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली. लग्नानंतर बॉलिवूडने साइडलाइन केल्याचा मुद्दा तिने मांडला. तिला काम करण्याची जास्त संधी मिळाली नाही.