Photo : गेट सेट गो! ‘रश्मी रॉकेट’साठी तापसीची खास तयारी
अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत आहे. (Get Set Go! Taapsee's Special preparation for 'Rashmi Rocket')

आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत आहे.

' थप्पड', 'बदला', 'पिंक', ' सांड की आंख','नाम शबाना' अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती 'रश्मी रॉकेट' या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच तिनं या चित्रपटातील तिचा लूक चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता. आता ती सातत्यानं या चित्रपटासाठीची तयारी करतानाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते.

ती या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत आहे. तिनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांना चकित केलं. ती पुणे- लोणावळा- मुंबई दरम्यान धावत प्रवास केला होता. तिनं ही बाब सोशल मीडियावर शेअर करताच तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसलं.

शिवाय ती दररोज व्यायामसुद्धा करते.

'If “Nahiiiiiiiiiiii” had an emoji face !' असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला आहे.